आष्टी : स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी व्यक्त केले. आष्टी येथील छत्रपती शिवाजीनगर येथील राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि. एस. बी. सानप, सोमनाथ शेळके, डॉ. एन. के. सरकटे, जे. आर. बरसाले, प्रा. मनोजकुमार गायकवाड, श्रीकृष्ण टेकाळे, प्रल्हाद वाहुळे, दादाराव चौरै यांची प्रमुख उपस्थिती होती. जो समाज इतिहासाचे स्मरण ठेवतो तोच इतिहास घडवतो, असे सांगून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे घोगरे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी रमेश शेंडगे, शिवशक्ती आढाव, अंबादास पोळ, सुनील बागल, कैलास भोसले, कृष्णा बागल, दिलीप बुजुळे, गोविंद बागल, माउली शेंडगे, नारायण सोळंके यांनी प्रयत्न केले.
इतिहासाचे स्मरण ठेवणारेच इतिहास घडवतात-घोगरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST