शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ति’च्या जन्मासाठी कन्यारत्न, माहेरभेट पुरस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन / जळगाव सपकाळ : मुलीच्या जन्माचे स्वागत करून जन्मदर वाढावा यासाठी तालुक्यातील हिसोडा ग्रामपंचायतीने स्तुत्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / जळगाव सपकाळ : मुलीच्या जन्माचे स्वागत करून जन्मदर वाढावा यासाठी तालुक्यातील हिसोडा ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. मुलगी जन्माला आलेल्या कुटुंबांना कन्यारत्न व माहेरभेट असे पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी या पुरस्काराचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये गावातील कन्यारत्न पुरस्कारासाठी सात मुलींच्या नावे प्रत्येकी दोन हजार रुपये सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्यात आली. तर माहेरभेट पुरस्कारासाठी एका महिलेला एक हजार रु पयांचे बक्षीस देण्यात आले.हिसोडा येथील ग्रामपंचायतीने मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी शासनाच्या नियमानुसार चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून कन्यारत्न व माहेरभेट असे दोन पुरस्कार देण्याचे उपक्रम ठरवला. योजनेत सहभाग घेण्यासाठी गावातून अर्ज मागविण्यात आले. त्यात गावातून कन्यारत्न पुरस्कारासाठी ७, तर माहेरभेट पुरस्कारासाठी १ अर्ज प्राप्त झाला होता. कन्यारत्नसाठी दोन हजार रु पये तर माहेरभेटसाठी एक हजार रु पये देण्यात आले. मुलीच्या नावाने प्रत्येकी दोन हजार रुपये दहा वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट करण्यात आले आहे.मुलीच्या घटत्या जन्मदरामागे आधुनिक तंत्रज्ञानाच्या गैरवापराबरोबर स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक हे कारणीभूत आहे. प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कन्यारत्न व माहेरभेट पुरस्कार देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे ग्रा.पं. पदाधिका-यांनी सांगितले.