शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामांना हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:38 IST

जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने ‘जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्र सामुग्री अर्थसहाय्य योजना’ सुरू केली ...

जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने ‘जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्र सामुग्री अर्थसहाय्य योजना’ सुरू केली आहे. योजनेअंतर्गत जेसीबी, पोकलेन यासारखी उत्खनन यंत्रसामुग्री खरेदीसाठी पाच लाख ९० हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. राज्यातून एक हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट असून मराठवाड्यातील सर्वाधिक २५५ लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.जलयुक्त शिवार अभियानाची कामे अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावीत, यासाठी शासन आग्रही आहे. त्यामुळे जलयुक्तच्या कामांसाठी अनेक निकष लावण्यात आले आहेत. परंतु हे निकष कंत्राटदारांना जाचक वाटत असून अनेकांनी या कामांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शासनाने सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, सहकारी संस्था व कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून जलयुक्तच्या कामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसाठी लागणारे जेसीबी, पोकलेन इ. उत्खनन यंत्रसामुग्री खरेदीसाठी शासनाने वरील घटकांना अर्थसाह्य करण्यासाठी ‘जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसाह्य’ योजना सुरू केली आहे. मृदा व जलसंधारण विभागांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनेची अंमलबजावणी शासनाच्या सहकार विकास महामंडळामार्फत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत राबविण्यात येणार आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि राज्यात उपलब्ध होणा-या यंत्रांची संख्या विचारात घेऊन योजनेचा कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.------------अशी होईल योजनेची अंमलबजावणीया योजनेच्या अंमलबजावणीस पाच जानेवारीपासून सुुरुवात झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांची जिल्हास्तरीय समितीमार्फत छाननी करून सहकार विभागास प्रस्ताव सादर केला जाईल. पात्र प्रस्तावांना मंजुरी देऊन वित्तीय अर्थसाह्य करणा-या संस्थांना पत्र दिले जाईल. वित्तीय संस्थांकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला यंत्रसामुग्री खरेदी करता येणार आहे. यासाठी वित्तीय संस्थांकडून १७ लाख ६० हजारांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. कर्जावरील पाच लाख ९० हजारांचे व्याज शासनाकडून अनुदान म्हणून पाच वर्षात बँकांना दिले जाणार आहे. यंत्रसामुग्री खरेदीची वीस टक्के रक्कम खरेदीदारास स्वत: भरावी लागेल, अशी माहिती जालन्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दिली.---------------‘जलसमृद्धी’साठी मराठवाड्याला प्राप्त उद्दिष्टजिल्हा लाभार्थी संख्याऔरंगाबाद १५जालना २५नांदेड ५०हिंगोली ५०परभणी ४०बीड २५लातूर २५उस्मानाबाद २५------------------