शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

जालन्याचा पारा ४४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:49 IST

रविवारच्या सुटीत पारा ४४.१ अंशावर गेल्याने जालनेकर वैतागून गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्याचा पारा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही - लाही होत आहे. रविवारच्या सुटीत पारा ४४.१ अंशावर गेल्याने जालनेकर वैतागून गेले होते. २० एप्रिलपासून तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. २६ रोजी ४३ अंशांवर तापमान होते. यात वाढ होऊन २८ एप्रिलला पारा थेट ४४ अंशांवर गेल्याने शहरात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने येथील नगरपालिका परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात सुध्दा ग्राहकांची गर्दी कमी दिसून आली. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तापमानाचा पारही खाली आला होता. यामुळे होणा-या गरमीपासून नागरिकांनी दिलासा मिळाला होता. मात्र जसजसा मे महिना जवळ येत आहे. यामुळे पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पारा ४४ अंशांवर गेल्याने या वर्षातील तापमानाने सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. पुढील काही दिवसांत यात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.जिल्ह्यात आधीच वृक्षांची कमतरता आहे. असे असताना सुध्दा जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढतच आहे. यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाला धोका निर्माण झाला वाढत्या वृक्षतोडीमुळे जिल्ह्यात पर्जन्यमान घटले असून गेल्या चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वृक्षतोडीचा परिणाम तापमानावर झाला आहे. यामुळे पहिल्यांदाच पारा ४४ अंशांवर गेला आहे.याला जिल्ह्यात होत असलेली बेसुमार वृक्षतोड जबाबदार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. उन्हाची तीव्रता इतकी आहे की, सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. सकाळी ११ वाजेनंतर घराबाहेर पडणे नकोसे वाटत आहे. सर्वत्र कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, दुपारी रस्ते सामसूम होताहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील रहदारी कमी होत आहे.दैनंदिन व्यवहारावरही याचा परिणाम झाला आहे.मामाचौक, शिवाजी पुतळा, अंबड चौफुली, गांधी चमन, भोकरदन नाका इ. परिसरात नियमित दिसणारी गर्दी विरळ झाली होती. ग्राहक सायंकाळी साडेपाच नंतरच घराबाहेर पडत आहेत. तर सकाळी ११ च्या आतच दैनंदिन व्यवहार उरकून घेत आहेत.सूर्यास्तानंतरही उष्णतेची लाट कायम असते. रात्री साडेसात ते आठ वाजेपर्यत वातावरणात गरम हवा राहत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंड पेय पिण्यासाठी गर्दी करतात. तसेच पंखे, कूलर खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातTemperatureतापमान