परतूर : आरोग्य विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये काही दोष आढळल्यास उपचारही करण्यात येत आहेत.
कोरोना विषाणूचा धोका हळूहळू कमी होत असल्याने नववी ते बारावी दरम्यानचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांची याच पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली आहे. यावेळी ज्या विद्यार्थ्यांना आजाराची काही लक्षणे आढळून आली त्यांना गोळ्या, औषधेही देण्यात आली. ही तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. काकडे, एलएमओ डॉ. पी. एस. काकडे, राणी शफीया परवीन, एस. व्ही काळवणे या आरोग्य विभागाच्या पथकाने केली. यावेळी मुख्याध्यापक वसंत सवणे, संतोष साळवे, त्र्यंबक घुगे, प्रमोद कामठे, व्ही. एस. तनपुरे आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ : परतूर शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासणी करताना आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी.