शहरातील लक्कडकोट भागातील एका दारू दुकानातून दारूच्या बॉक्सची वाहतूक होत असल्याची माहिती मंगळवारी रात्री गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून या पथकाने लक्कडकोट भागात कारवाई करून एक कार ताब्यात घेतली. त्यावेळी ५७ हजार ६०० रुपयांची दारू व कार जप्त करण्यात आली. यावेळी रामेश्वर दत्ता पवार, अनिकेत परमेश्वर वाघ (रा. देऊळगाव राजा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वरील दोघांसह दुकान चालक सतीश ऊर्फ लाला प्रकाश जैस्वाल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुभाष भुजंग, सपोनि. शिवाजी नागवे, पोना कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे यांच्या पथकाने केली.
अर्ध्या लाखाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST