देऊळगाव राजा : तालुक्यातील तुळजापूर शिवारात सुमन श्रीधर तिडके यांच्या शेतात स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. शेतीशाळेत कपाशी पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण याबद्दल कृषी सहायक श्रीकांत पडघान यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कपाशी पीक सध्या पाते आणि फुलोरा अवस्थेत आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन कृषी विभागाने बोंडआळी सर्वेक्षण करणे आणि नियंत्रणासाठी लोकांमध्ये जागृती करणे सुरू केले आहे. २ ऑगस्ट २०२१ पासून देऊळगावराजा तालुक्यातील कृषी सहायक विविध ठिकाणी बोंडआळीचे सर्वेक्षण करीत आहे. यासाठी एकरी दोन फेरोमोन ट्रॅप शेतामध्ये लावून उपस्थित शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप्सद्वारे सर्वेक्षण कसे करावे? आर्थिक नुकसान पातळी कशी तपासावी? आणि त्या आधारे गुलाबी बोंडआळीचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना अनंत देशमुख यांनी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.