देशमुख यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
बदनापूर : तालुक्यातील दाभाडी जिल्हा परिषद शाळेला कृषी अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी केंद्रप्रमुख विकास पोथरे, मुख्याध्यापक पी.डी. खरात, महेश देशमुख, श्रीकृष्ण अरदवाड, संदीप ओळेकर, मुमताज शेख, सारिका जांभईकर, किरण गोऱ्हे आदींची उपस्थिती होती.
कायदेविषयक शिबिरास प्रतिसाद
जाफराबाद : शासनाच्या ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या उपक्रमांतर्गत आयोजित कायदेविषयक शिबिरात न्यायाधीश अरुण व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. एस.पी. सिरसाट, ॲड. जी.ए. क्षीरसागर, ॲड. के.डी. गायकवाड, ॲड. विष्णू शिंदे, ॲड. सुनील चव्हाण, ॲड. विकास जाधव, ॲड. वर्षा देशपांडे, ॲड. संदीप सोनुने आदींची उपस्थिती होती.
राजेगाव येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
घनसावंगी : तालुक्यातील राजेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात किशोरी संघाची बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य समुपदेशक लहू मिसाळ, डॉ. सचिन घुगे यांनी मुलामुलींना मार्गदर्शन केले. पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
धम्मगिरी येथे बुद्ध पौर्णिमा साजरी
अंबड : तालुक्यातील धम्मगिरी येथे धम्मसकाळ ग्रुपच्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी बौद्धगुरू मिलिंद महाथेरो यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर माहिती दिली. तसेच यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी चंद्रकांत दिलपाक, शिवाजी गाढेकर, धोपेकर, अशोक पटेकर, राष्ट्रपाल जाधव आदींची उपस्थिती होती.