शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणारी ग्रामसेविका सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:13 IST

जालना तालुक्यातल्या हिवरा रोषणगाव येथील ग्रामसेविका सारिका उत्तमराव तायडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तीन हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

जालना : जालना तालुक्यातल्या हिवरा रोषणगाव येथील ग्रामसेविका सारिका उत्तमराव तायडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तीन हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. फायनान्स कंपनीकडून गृह कर्ज घेण्यासाठी गावातल्या घराच्या नमुना क्रमांक आठवर कर्ज बोजा नोंद करून देण्यासाठी ग्रामसेविकेने तक्रारदाराकडे लाच मागितली होती.या प्रकरणातील तक्रारदाराने गावात फायनान्स कंपनीच्या अर्थसाहाय्याने घर बांधले होते. त्यासाठी फायनान्स कंपनीला आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. फायनान्स कंपनीने हिवरा रोषणगावच्या ग्रामसेविका सारिका तायडे यांच्या नावे पत्र देऊन तक्रारदारास नमुना क्रमांक आठवर कर्जाचा एक लाखाचा बोजा टाकू न आणण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदारास कर्ज रक्कम देण्यात येणार होती. ग्रामसेविकेने या कामासाठी तीन हजारांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी ग्रामसेविका राहत असलेल्या सोनलनगर परिसरातील घरात सापळा लावून सारिका तायडे यांना तीन हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.