शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीला सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:46 IST

बोंडअळीच्या नुकसानीला सरकारच जबादार असल्याचा आरोप मंगळवारी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुलाबी बोंडअळीमुळे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतक-यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. बोंडअळीची सुरुवात मागील वर्षीची झाली होती. त्याच वेळी सरकारने जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र, बियाणे कंपन्यांना दोषी ठरवून प्रतिबंधात्मक उपायांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे बोंडअळीच्या नुकसानीला सरकारच जबादार असल्याचा आरोप मंगळवारी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला.शेतकरी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, यवतमाळचे विजय निवल व कोल्हापूरचे अजित नरदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. शेतकºयांना नवतंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम बनविण्याची गरज आहे. मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासनाने व्यापक प्रचार मोहीम सुरू करून त्याबाबत शेतक-यांना जागृत करणे आवश्यक होते. गुजरात सरकाने बोंडअळीचा परिणाम झाल्यानंतर ७० कोटी रुपयांचा निधी याबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यासाठी खर्च केला. मात्र, राज्य सरकाने ही बियाण्याची समस्या समजून सिड्स कंपन्यांना दोषी ठरवले. जनुकीय तज्ज्ञ अजित नरदे म्हणाले, जीएम तंत्रज्ञानातील बीजी एक व बीजी दोन या बिटी बियाण्यांना अनुक्रमे २००२ व २००६ मध्ये परवानगी मिळाली. अन्य देशात सात जीएम तंत्रज्ञानाचा वापर सुरू असताना, भारतात राजकीय विरोध, दूरदृष्टीचा अभाव यामुळे आजही जीएम दोननंतरचे नवीन तंत्रज्ञान शेतक-यांना मिळालेले नाही. विजय निवल म्हणाले, की भारताने सिडस कंपन्यांना नवीन जीएम तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी दिली नाही तर शेतकरीच नव्हे तर भारताची अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल. कारण भारतीय अर्थव्यवस्थेत कापूस आणि वस्त्रोद्योगाला सर्वाधिक महत्त्व आहे. मात्र, आता वापरत असलेले तंत्रज्ञान कमकुवत झाल्याने उत्पादनात घट होत आहे.या वेळी शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब कदम, महिला प्रांताध्यक्ष गीता खांडेभराड, जिल्हाध्यक्ष सुधीर शिंदे, बाबूराव गोल्डे आदींची उपस्थिती होती.