शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिकारी तांगडेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:02 IST

परतूर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांच्यावर सिंचन विहिरी वाटपात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शुक्रवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांच्यावर सिंचन विहिरी वाटपात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शुक्रवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.परतूर तालुक्यात पंचायत समिती मार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१७, २०१८ व २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ५६२ विहिरींचे उद्दिष्ट दिलेले होते. मात्र, १५८९ अधिकच्या म्हणजे एकूण २१५१ विहिरी वितरित करण्यात आल्या. तसेच गटविकास अधिकारी तांगडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मौजे शेवगा येथे ११ सिंचन विहिरी बनावट कागदपत्रे तयार करून नियमानुसार मंजुरी न घेता हजेरी पत्रक तयार करून पैसे वाटप केले. विहीर मंजूर करताना नियमानुसार कार्यवाही न करता, इतरांचे अधिकार स्वत:च वापरणे, प्रशासकीय मान्यता आपल्या अधिकारात देऊन खोटी कागदपत्रे तयार करून १३ लाख ६ हजार ३०४ रूपये बेकायदेशीररीत्या वाटप केले. याप्रकरणी प्रभारी गटविकास अधिकारी तांगडे यांची विभागीय चौकशीही करण्यात आली होती. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी विद्यमान प्रभारी गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांना तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCourtन्यायालय