शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तणाव मुक्तीसाठी खेळ महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:58 IST

जालना : तणावापासून मुक्तीसाठी खेळाला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून, खेळाडूंनी जय, पराजयाची तमा न बाळगता खिलाडू वृत्तीचे दर्शन ...

जालना : तणावापासून मुक्तीसाठी खेळाला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून, खेळाडूंनी जय, पराजयाची तमा न बाळगता खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर तीन दिवसीय विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पधेर्चे उद्घाटन गुरुवारी लोणीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. चे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आ. राजेश टोपे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, बीडचे एम.डी. सिंह, लातूरचे जी. श्रीकांत, औरंगाबादचे नवलकिशोर राम, परभणीचे पी. शिवशंकर, हिंगोलीचे अनिल भंडारी, नांदेडचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर आयुक्त विजयकुमार फड, उपायुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त साज्ञा सावरकर, एसआरपीचे समादेशक भारत तांगडे, आरपीटीएसचे प्राचार्य पवार, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांची उपस्थिती होती. तीन दिवस चालणा-या या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत ४० क्रीडा प्रकारात खेळाडू क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत. लोणीकर म्हणाले की, कामातील शारीरिक आणि मानसिक थकवा घालविण्यासाठी, पुन्हा उत्साह- चैतन्य-आनंद निर्मितीसाठी क्रीडा व सांस्कृतिक प्रकारातील सहभाग आवश्यक ठरतो. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी महसूल विभागावर असून, विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. भापकर म्हणाले की, तणावापासुन मुक्तीसाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा अत्यंत उपयुक्त आहेत. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेमध्ये आठही जिल्ह्यांतील २ हजारांपेक्षा अधिक खेळाडू ४० क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी जिल्ह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोबाईल अप विकसित केले असून या माध्यमातून या स्पर्धेचे नियोजन तसेच माहिती  उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटविण्यात आली. आठही जिल्ह्यातून आलेल्या संघाच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संचलनाच्या स्पर्धेत बीड जिल्ह्याने प्रथम, औरंगाबादने द्वितीय तर जालना जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला. यानंतर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले तर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी आभार मानले.