शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या तीन तरुणांसोबत बनावट लग्न करून फरार झालेली टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 19:52 IST

काही दिवसांपूर्वी गुजरात येथील तीन युवकांसोबत बनावट लग्न करून तीन मुली पळून गेल्या होत्या

ठळक मुद्देया महिलेने औरंगाबाद, बीड व बुलडाणा जिल्ह्यांतही बनावट लग्न करून अनेकांना फसवले आहे.

जालना : गुजरात येथील तीन युवकांसोबत बनावट लग्न करून लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीस चंदनझिरा पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. तीन खोट्या नवऱ्या, टोळीप्रमुख महिलेसह एकास अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी गुजरात येथील तीन युवकांसोबत बनावट लग्न करून तीन मुली पळून केल्याची तक्रार गुजरात येथील पीयूष वसंत यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली होती. सदरील गुन्ह्याचा तपास करत असताना, बनावट नवरी बनलेली मुलगी जालना शहरातील शनिमंदिर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सदरील मुलीला ताब्यात घेतले. त्या मुलीला अधिक विचारपूस केली असता, तिने बनावट लग्न केल्याची कबुली दिली. तिने इतर महिलांची नावे व राहण्याचे ठिकाण सांगितले. औरंगाबाद, बुलडाणा, जालना येथून तीनही महिलांना ताब्यात घेण्यात आले. नवरीचा भाऊ बनून त्यांच्यासोबत असणारा राहुल म्हस्के (रा. नागेवाडी) याला नागेवाडी टोलनाका येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ महागडे मोबाइल, बॅग, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली क्रूझर गाडी असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पो.नि. श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, विजय साळवे व महिला नाईक रेखा वाघमारे यांनी केली.

विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखलपोलिसांनी टोळीप्रमुख महिलेला बुलडाणा येथून ताब्यात घेतले आहे. या महिलेने औरंगाबाद, बीड व बुलडाणा जिल्ह्यांतही बनावट लग्न करून अनेकांना फसवले आहे. या महिलेवर औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सर्वच आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक