शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

लूट प्रकरणी चार संशयित जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:56 IST

औद्योगिक वसाहतीमधील लूट प्रकरणातील चार संशयितांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील लूट प्रकरणातील चार संशयितांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह सहा लाख रुपये जप्त केले आहेत.औद्योगिक वसाहतीमध्ये २४ मे रोजी गिताई स्टील कंपनीचे व्यवस्थापक सनी गणेश चिलखा हे भाग्यलक्ष्मी स्टील कंपनीच्या मालकांकडून सहा लाख रुपये घेवून एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून चिलखा यांच्याकडी सहा लाख रुपये असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला होता. चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी लगेच तपास सुरू केला. भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकरणाचा तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. दरम्यान, गौर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आकालसिंग राजूसिंग जुन्नी (रा. जालना) याने साथीदारांच्या मदतीने लुटमार केल्याचे समोर आले. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, साहाय्यक उपनिरीक्षक रज्जाक शेख, भालचंद्र गिरी, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, गोकळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, समाधान तेलंग्रे, रंजित वैराळ, विलास चेके यांनी ही कारवाई केली.संशयित लुट प्रकरणातील रक्कम वाटून घेवून वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिन्ही पथकाने ३६ तास संशयितांचा शोध घेवून संशयित कपील उर्फ प्रकाश उर्फ पक्या सुंदरलाल जैन (३०) अर्जुन उर्फ धती किशोर धाकतोडे (२३), आकाश राजूसिंग जुन्नी (१९ , किशोर भास्करराव पडूळ (२४, दोघे रा. टीव्ही सेंटर, जालना) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये लुटमार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ४० हजारांची दुचाकी रोख सहा लाख रुपये व एक खंजीर जप्त केले आहे. चौघांनाही मंगळवारपर्यंत दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटक