शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मासेगाव येथून चार जनावरे चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

संस्कार प्रबोधनीचे परीक्षेत यश जालना : एनएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात संस्कार प्रबोधनी शाळेच्या ११ ...

संस्कार प्रबोधनीचे परीक्षेत यश

जालना : एनएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात संस्कार प्रबोधनी शाळेच्या ११ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यात वैभव शेवाळे, दीपाली मोडे, ऋषिका गोराडे, यशराज नन्नवरे, आदित्य सरडे, नरहरी नन्नवरे, योगिता देशपांडे, अनुष्का ढाकणे, आदिती मुळे, मयुरी कोठी आणि भाग्यश्री काटकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक भागवत मराठे, बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

शहरात कोरोना वीरांचा सत्कार

जालना : येथील घायाळ नगरमधील लोकमान्य विद्यालयात कोरोना वीरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेषराव खरात यांनी शाल -श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन शाळेतील शिक्षक नारायण भुजंग, अरविंद रंगारी, सुरेश घायाळ, संदीप राठोड, मनोहर सोनार आदींचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष त्रिंबक जाधव, सहसचिव गजानन भवर, कोषाध्यक्ष भाऊराव चव्हाण, संस्थापक अध्यक्ष तथा संचालक साहेबराव ढवळे, शालेय समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ वाघमारे आदींची उपस्थिती होती.

वाचनालयास ५ हजार रुपयांची मदत

जालना : रेवगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान वाढीस वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या वाचनालयास शीला जैस्वाल यांनी ५ हजार १०१ रुपयांची पुस्तके खरेदीसाठी मदत दिली आहे. कार्यक्रमास सरपंच वैशाली चव्हाण, उपसरपंच अनिता कदम, छाया बन, प्रभावती कंबळू, सुभद्रा शेळके आदींची उपस्थिती होती.

त्या शिक्षकाचे निलंबन रद्द

जालना : दाभाडी येथील शिवाजी विद्यालयात कार्यरत असलेले विलास रामचंद्र इंगळे यांचे शिस्तभंगाच्या मुद्द्यावरून निलंबन करण्यात आले होते. तसा अहवाल शिवाजी विद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिला होता; परंतु आता इंगळे यांनी यात आपली बाजू मांडल्यानंतर त्यांचे निलंबन शिक्षणाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे.

पूरग्रस्तांसाठी विद्यालयातर्फे फेरी

जालना : येथील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने कोकण विभागात आलेल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी फेरी काढण्यात आली. या फेरीतून जमा झालेला निधी पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे सचिव ब्रह्मानंद चव्हाण, बाबुराव भुतेकर, विजू खरात, अनिल खिल्लारे, प्राचार्य बाबासाहेब गवळी, डॉ. सुवर्णा चव्हाण, डॉ. पी.व्ही. वणजय यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.