शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजुरेश्वराचा जयघोष करीत भाविकांचे पायी लोंढे राजूरच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:36 IST

अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन चारही बाजंूनी भाविकांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गणरायाचा जयघोष करत २४ रोजी सोमवारीच राजूरच्या दिशेने कडाक्याच्या थंडीत पायी रस्ता धरला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : मंगळवारी येणाऱ्या अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन चारही बाजंूनी भाविकांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गणरायाचा जयघोष करत २४ रोजी सोमवारीच राजूरच्या दिशेने कडाक्याच्या थंडीत पायी रस्ता धरला होता. यामुळे चोहोबाजूंचे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.गणेशभक्तांत मंगळवारी येणाºया अंगारिका चतुर्थीचे दर्शन विशेष महत्त्वाचे मानतात. अंगारिका चतुर्थी वर्षातून एक किंवा दोन येतात. त्यामुळे मंगळवारी अंगारिका चतुर्थीचा दर्शन योग भाविकात विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यातच वर्षातील ही शेवटची अंगारकी चतुर्थी असून नाताळची सुट्टी असल्यामुळे भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याचा अंदाज आहे. दिवसेंदिवस मराठवाडा, खान्देश, विदर्भासह राज्याच्या कानाकोपºयातून श्रीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. या चतुर्थीला पायी येणाºया भाविकांची संख्या लक्षणीय असते. उद्याच्या चतुर्थीसाठी आज सोमवारीच सिल्लोड, अंबड, औरंगाबाद, देऊळगाव राजा, फुलंब्री आदी मार्गावरून महिला, पुरूष, चिमुकले भाविक कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता राजूरच्या दिेशेने मार्गक्रमण करताना दिसत होते. पायी येणाºया भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था, संघटना व दानशूर मंडळींनी मोफत चहा, पाणी, फराळ, आंघोळीकरिता थंड व गरम पाण्याची सोय रस्त्यावर जागोजागी करण्यात आलेली होती. थंडीमुळे भाविकांनी दुपारपासूनच राजूरचा रस्ता धरला होता. त्यामुळे भाविकांची गर्दी राजुरात दाखल होण्यास सुरूवात झाली होती. रात्री ९ वाजता गर्दीत वाढ झाली होती. गणपती संस्थानने भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी दर्शन रांगेत कठडे, थंडी पासून बचावासाठी मंदिर परिसरात निवारा, वैद्यकीय उपचार, पिण्यासाठी पाणी, पासधारक भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दर्शन रांगेत सीसीटीव्ही कॅमेरे तसेच महिला व पुरूष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा इ. जय्यत तयारी के ली आहे. तसेच अंगारिका चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पायी येणारे भाविक, ग्रामीण भागातून येणाºया दिंंड्या, समूहाने येणाºया भाविकांना सामान्य दर्शन रांगेतून प्रवेश देण्यात येणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम