शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दोन घटनांमध्ये पाच मुलींचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 21:24 IST

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जालना जिल्ह्यात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यात दोन-दोन अशा चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पहिली घटना तालुक्यातील कस्तुरवाडी येथे तर दुसरी घटना परतूर तालुक्यातील वाई येथे घडली.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यातील घटना

 बदनापूर (जि. जालना) : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यात दोन-दोन अशा चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पहिली घटना तालुक्यातील कस्तुरवाडी येथे तर दुसरी घटना परतूर तालुक्यातील वाई येथे घडली.  

कस्तुरवाडी येथे गावाजवळील लाहुकी नदीत काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूवत असताना सायमा जुम्मेखॉ पठाण (१४)  गजाला शेख मोईन (१९) व  राणी उर्फ सुरया शेख मोईन (१३) तिघी पाण्यात पडल्या. त्यांनी एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. गजाला व सुरया या सख्ख्या बहिणी, तर सायमा त्यांची मामेबहीण होती. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सिमा शे शब्बीर (१३) हिचाही पाण्यात तोल गेला, मात्र बाहेर पडल्यामुळे ती सुदैवाने वाचली.  

रुग्णवाहिका वेळेवर मिळाली असती तर...सायमा पठाण या मुलीस पाण्याबाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता, जर आम्हाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती ती वाचली असती. अनेक वेळा दवाखान्यात फोन लावला परंतु आम्हाला गाडी येत आहे, असे सांगण्यात आले. शेवटी तिघींचे मृतदेह बैलगाडीत घेऊन मुख्य रस्त्यावर आलो, अशी माहिती गावातील रऊफ बेग यांनी दिली.

वाईत दोन बहिणींचा बुडून मृत्यूवडिलांनी झाडावरून हाकललेली वानरे स्वत:च्या दिशेने आल्याने घाबरून साक्षी गायकवाड (९) व मिनाक्षी गायकवाड (६) या दोन  बहिणी विहीरीत पडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.  मंठा तालुक्यातील वाई येथे रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.