लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील युवक नीलेश क-हाळे खून प्रकरणातील पाच संशयित आरोपींना शनिवारी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता. पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नीलेशचा खून शुक्रवारी रात्री झाला होता. जुन्या वादातून हा खून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.शुक्रवारी रात्रीच सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणात मंगल ठाकूर याला ताब्यात घेतले होते. उर्वरित चार आरोपींना परतूर तालुक्यातील आंबा येथून अटक केली.शनिवारी या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. नीलेशचा खून हा प्रेमप्रकरणातून झाला असावा, असा कयास प्रथमदर्शनी लावला जात आहे. या प्रकरणात मंगल ठाकूर, भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, आकाश शिंदे, दत्ता जाधव यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाच आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:26 IST