शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बसमधील प्रथमोपचार साहित्य गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:12 IST

महामंडळाच्या वतीने प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र ५० बसमधील पेट्यांतील साहित्य गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. चालक, वाहकाबरोबर प्रवाशांची काळजी म्हणून प्रथोमपचार करण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र ५० बसमधील पेट्यांतील साहित्य गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.जालना, परतूर, जाफराबाद आणि अंबड असे चार आगार मिळून जिल्ह्यात २१० बस सेवेत आहेत. मुुंबई येथील भांडार आणि खरेदी विभागाकडून बसमध्ये प्रथमोउपचार पेट्या साहित्यासह पुरविल्या जातात. मात्र चालक-वाहक यांच्या हलगर्जीपणामुळे बसमधील पेट्यातील साहित्य गायब झाले आहे. अपघात घडल्यास, जखम किंवा गंभीर दुखापत झाली असल्यास उपचारासाठी बसमध्ये प्रथोमपचार पेटी बसवलेली असते. या पेटीत बॅण्डेज, मलम, आयोडीन, चिकटपट्या, गोळ्या आदी साहित्य ठेवण्यात येते. याची सर्वशी निगराणी करण्याच्या सूचना चालक-वाहकांना असतात. बहुतांश बसमध्ये प्रथमोपचार पेट्यातील साहित्य चोरीस गेल्याचे निर्दशनास आले. विशेष म्हणणे शहरातील आगारातून पुणे, मुंबई, नागपूर आदी लांब पल्ल्याच्या बस जातात या गाड्यांना अपघात होण्याची भीती असते. मात्र प्रवाशांवर प्रथमोपचार करण्यासाठी जर साहित्यच नसेल, तर प्रवाशाच्या जीवही जाऊ शकतो. याकडे विभागीय नियंत्रकांनी गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.