शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शहरात फायर सेफ्टीचे ‘आॅडिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:52 IST

शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी इमारती, रुग्णालये, पेट्रोल पंप या ठिकाणी आगीच्या घटना घडल्यास, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध आहेत का, याची मुंबईच्या विशेष पथकाने मंगळवारी दिवसभर तपासणी केली. या तपासणीचा गोपनीय अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे पथकातील अधिका-यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी इमारती, रुग्णालये, पेट्रोल पंप या ठिकाणी आगीच्या घटना घडल्यास, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध आहेत का, याची मुंबईच्या विशेष पथकाने मंगळवारी दिवसभर तपासणी केली. या तपासणीचा गोपनीय अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे पथकातील अधिका-यांनी सांगितले.मुंबई येथील कमला मीलमधील आगीच्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था विभागाने आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात ‘ फायर सेफ्टी आॅडिटची द महाराष्ट्र फायर प्रिव्हेंटेशन अ‍ॅण्ड लाईफ सेफ्टी अ‍ॅक्ट २००६ ’नुसार तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईच्या तीन अधिकाºयांचे एक पथक मंगळवारी शहरात दाखल झाले. पथकाने अग्निशमन दलाचे प्रमुख जाधव यांना सोबत घेवून शहरातील विविध अस्थापना, शाळा, पेट्रोलपंप, मोठी रुग्णालये, व्यापारी इमारती याची तपासणी सुरू केली आहे. अचानक आगीच घटना घडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून इमारतीमध्ये अग्निशमन विरोधी यंत्र बसविले आहे का, तातडीने बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. इमारतीचे फायर सेफ्टी आॅडिट केले आहे का याची पथकातील अधिका-यांनी रात्री उशिरापर्यंत बारकाईने तपासणी केली. हे पथक आणखी दोन दिवस शहरातील विविध अस्थापनांसह शासकीय कार्यालयांचीही तपासणी करणार आहे. तपासणीचा गोपनीय अहवाल शासनास सादर केला जाणार आहे.