लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित टेंभुर्णी, ता.जाफराबाद येथील शाखेने कर्ज प्रकरणी आरोपी विठ्ठल रंगनाथ देशमुख यांना सण २००० साली २५ हजार रुपये कर्ज दिले होते.कर्जाच्या परत फेडीसाठी १२ सप्टेंबर २००७ रोजी ५२ हजार ४६४ रुपये रकमेचा धनादेश घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी दिला होता.मात्र देण्यात आलेल्या धनादेशाच्या व्यवहाराचे खाते आधीच बंद करण्यात आल्याने सदरील चेक बँकेत वटल्या गेला नाही म्हणून बँकेची फसवणूक झाली म्हणून बँकेने हे प्रकरण न्यायालयात दाखल केले.बँकेने दिलेल्या दिलेल्या या कर्ज प्रकरणी न्यायालयाने सर्व प्रकारच्या बाबीची तपासणी करून जाफराबाद न्यायालयाने आरोपी विठ्ठल देशमुख यांना नुकसान भरपाई म्हणून ५२ हजार ४६४ रुपये देण्याचे आदेश दिला होता.परंतु या निर्णया विरुद्ध आरोपी विठ्ठल देशमुख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देत अपील दाखल केले.सदरील प्रकरण जिल्हा न्यायालयात न्यायदाना साठी आले असता जिल्हा सत्र न्यायाधीश नीरज धोटे यांनी यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत बँकेला ५२ हजार ४६४ रुपये पंधरा दिवसाच्या आत भरण्याचे निर्देश दिले.
नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:21 IST