शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर

By विजय मुंडे  | Updated: June 28, 2023 20:16 IST

राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली नव्हती. त्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसूनच आंदोलन केले होते.

जालना : शासनाने बुधवारी राज्यातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांसाठी चार हजार ३६५ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.त्यात जालना येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या तसेच ४३० खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा ही समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयास निधी मिळावा, यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले होते. आ. गोरंट्याल यांनी हा विषय सातत्याने शासन दरबारी लावून धरला होता.

जालना येथील शासकीय रूग्णालय, स्त्री रूग्णालयात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील रूग्णही उपचारासाठी येतात. येथील रूग्णालयांवरील वाढलेला रूग्णांचा ताण आणि जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची गरज पाहता आ. कैलास गोरंट्याल यांनी गत अनेक वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा केला होता. आ. अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना शासनाच्या पथकाने जालना जिल्ह्याचा दौरा करून कुंभेफळ शिवारातील जागेची पाहणी केली होती. त्यानंतर २५ एकर जमीनही वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर झाली होती. या प्रक्रियेनंतर शासनाने वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीचा जीआरही काढला होता. परंतु, राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली नव्हती. त्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसूनच आंदोलन केले होते. या आंदोलनात माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. राजेश राठोड यांनीही सहभाग घेत मागणीला पाठींबा दिला होता.

मनोरूग्णालयाचा प्रश्न कायमजालना येथील मनोरूग्णालयाच्या बांधकामासाठी जवळपास ९४ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यासाठी जागाही उपलब्ध आहे. परंतु, शासनाने टाईप प्लॅन बदलांचे कारण देत बांधकामाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती अद्याप उठलेली नाही. त्यामुळे जालन्यातील मनोरूग्णालयाचे काम होणार की ते इतर जिल्ह्यात स्थलांतरित होणार यावरही दिवसभर चर्चा रंगली होती.

भाजपकडून जोरदार स्वागतकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जालना- जळगाव नवीन ब्रॉडगेजसाठी ३५५२ कोटी रूपये खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याच सोबत जालन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास निधी दिला आहे. शासनाच्या या निर्णयाचे भाजपाच्या वतीनेही स्वागत करण्यात आले आहे.

पाठपुरावा सुरु राहणारजालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. आपल्या मागणीला यश आल्याचे समाधान असून, वैद्यकीय महाविद्यालयाचे यापुढील काम वेळेत व्हावे, यासाठीही आपला पाठपुरावा राहणार आहे.- आ. कैलास गोरंट्याल

टॅग्स :Jalanaजालनाhospitalहॉस्पिटल