शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर भोकरदन शहरासाठी दहा टँकरला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:39 IST

गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता.

ठळक मुद्देमंजूषा देशमुख : पाणी शुद्ध करून देणार, जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच मंजुरी दिल्याने टंचाईवर तोडगा शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता.बुधवारी नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, राजाभाऊ देशमुख तसेच उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन तातडीने भोकरदनमध्ये दहा टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच तसा रितसर प्रस्तावही दिला होता. ही मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहिती नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.शहराला पाणीपुरवठा करणारे दानापुर येथील जुई धरण कोरडे पडल्यामुळे शहरात तीव्र पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नगर परिषदेने तातडीची विशेष सभा घेऊन २५ टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे दिला होता. या प्रकरणी बुधवारी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाअधिकाºयांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाणी प्रश्न किती गंभीर आहे याची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाºयांनी ३ आॅक्टोबर रोजी बाणेगाव धरणातील विहिरीतून पाणीपुरवठा करण्यासाठी २४ हजार लीटर क्षमता असलेल्या १० टँकरला मंजुरी दिल्याचे यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले.या टँकरच्या माध्यमातून दररोज ७ लाख २० हजार लीटर पाणी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात ओतून ते नळाद्वारे पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठीही त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था शुद्धीकरण केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.यावेही उपनगरअध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी, मुख्याधिकारी सोंडगे, नगरसेवक, सुरेश शर्मा, संतोष अन्नदाते, संध्या शर्मा, गयाबाई जाधव, शेख रिजवान, विजय इंगळे, नसीमखॉ पठाण, दीपक बोर्डे, हामदू चाऊस, शेख जफर, दीपक तळेकर यांची उपस्थिती होती. यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

टॅग्स :Jalanaजालनाwater transportजलवाहतूक