पाथरवाला खुर्द शिवारातील गट क्रमांक १२२, १२३ मध्ये गहिनीनाथनगर येथील शोभा गर्जे यांचा २, गोरख गोल्हार २, साईनाथ वारे ५, रामनाथ तांदळे १, बाबासाहेब तांदळे १, उत्तम शिरसाठ १ तर नामदेव तांदळे यांचा दोन एक ऊस आहे. हा ऊस तोडणी आला होता. परंतु, मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या वाहिनीवर शॉर्टसर्किट झाले. यामुळे उसाला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की, तिला विझवता आले नाही. यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मागील दोन दिवसांपासून या भागात विजेची बिघाड झाली होती. मंगळवारी महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. ट्रायल घेत असतानाच तारांचे घर्षण होऊन आग लागली. महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
फोटो
पाथरवाला खुर्द शिवारात शॉर्टसर्किटमुळे आग लागून १५ एकर ऊस जळून खाक झाला.