शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या प्रादुर्भावाने कुटुंब शेतात गेले; दरोडेखोरांनी संधी साधत मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 13:52 IST

Crime News मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भालगाव येथील मच्छिंद्र म्हस्के हे आपल्या कुटुंबासह शेतात राहण्यासाठी गेले होते.

ठळक मुद्देअंबड तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ 

अंबड (जि.जालना) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतात राहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला दरोडेखोरांनी जबर मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ८१,५००  रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना अंबड तालुक्यातील भालगाव येथे सोमवारी सकाळी अडीच वाजेच्या सुमारास घडली. 

मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भालगाव येथील मच्छिंद्र म्हस्के हे आपल्या कुटुंबासह शेतात राहण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री ते आपल्या कुटुंबासोबत  पत्राच्या शेडमध्ये झोपलेले होते. अडीच वाजण्याच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी घराचा दरवाजा वाजविला. मच्छिंद्र म्हस्के यांनी दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दररोडेखोरांनी शेजारच्यांसह म्हस्के कुटुंबालाही मारहाण केली. यात एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर अंबड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व मोबाईल असा ८१,५००  रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोनि. हुंबे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.  सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोनि. भुजंग यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी चार मोबाईल सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना