शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा मानसिक दडपणाखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:02 IST

शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवेअंतर्गत शेतकरी कुटुंबियांचे समुपदेशन व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवेअंतर्गत शेतकरी कुटुंबियांचे समुपदेशन व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पातून दोन वर्षात अडीच हजार शेतक-यांचे समुपदेशन करण्यात आले असून, अनेक शेतकरी मानसिक दडपणाखाली वावरत असल्याचे समोर आले आहे.मागील काही वर्षांत विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, पिकांना न मिळणारा भाव, मुलींच्या लग्नांची चिंता यामुळे शेतकरी मानसिक दडपणाखाली वावरत असल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे. अशा स्थितीत शेतक-यांना मानसिक बळ देण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते. याकरिता गत दोन वर्षांपासून शासनाने १४ जिल्ह्यांत प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या प्रेरणा प्रकल्पात मानसोपचार तज्ज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रत्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, परिचारिका, कम्युनिटी नर्स यांचा समावेश आहे.मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातून दोनदा बाह्यरुग्ण विभागात येणाºयांची तपासणी करून समुपदेशनासह उपचार करत आहेत. दोन वर्षात बाह्यरुग्ण विभागात १५ हजार ७४८ जणांची तपासणी करण्यात आली असून, पैकी एक हजार ६२४ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच मानसिक दडपणाखाली असणाºया १ हजार ९६७ शेतकºयांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी, गावात कार्यरत आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देऊन गावोगावी जाऊन शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करत आहेत. समुपदेशानामुळे अनेक कुटुंबीयांना फायदा झाला आहे.औषधोपचाराची गरज असणा-यांना विविध आरोग्याशी संबंधित शासकीय योजनांच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे.