शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे - रामदेव बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : शेतक-यांनी सेंद्रिय शेती करून विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन योग गुरु रामदेव बाबा ...

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शेतक-यांनी सेंद्रिय शेती करून विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन योग गुरु रामदेव बाबा यांनी केले. भोकरदन येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन शहरात कृषी उत्पन्न बजार समितीच्या प्रांगणात शनिवारी हा मेळावा घेण्यात आला. या वेळी खा़ रावसाहेब दानवे, आ़ संतोष दानवे, आ़ नारायण कुंचे, निर्मला दानवे, डॉ. जयदीप आर्य, राधेश्याम गोयल, प्रा़ राजेश सरकटे, बाजार समितीचे उपसभापती भास्करराव दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.रामदेव बाबा म्हणाले, की कृषी प्रधान भारताला जगात अत्यंत महत्त्व आहे. शेतकरी सुखी समृध्दी झाला तरच खºया अर्थाने देशाची प्रगती होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी सेंद्रिय शेती करावी. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायीचे पालन करावे. वनशेती केल्यास कोरफड, गुळवेल अशा असंख्य वनस्पतीची आम्ही खेरदी करू. वनशेतीतून एकरी २ ते ५ लाखांपर्यंत उत्पादन होऊ शकते. पतंजलीच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी शेतकरी जोडले आहेत. येणा-या काळात पाच कोटी शेतकरी जोडण्याचा संकल्प केला आहे. शेतकºयांचा उत्पादित मालावर प्रक्रिया करून चांगला मोबदला देण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. शरीर स्वास्थ्य व मन:शांतीसाठी प्रत्येकाने योग साधना करण्याचे आवाहन त्यांनी केले. खा़ दानवे म्हणाले की मराठवाड्यात मका, सोयाबीन, मोंसबीचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. त्यावर पतंजलीने प्रक्रिया उद्योग काढण्याची विनंती त्यांनी केली. आ. दानवे यांनी भोकरदन-जाफराबाद मतदार संघातील बचत गटांचे उत्पादने पतंजलीच्या माध्यमातून खरेदी केली तर या भागात रोजगार वाढण्यास मदत होईल, असे सांगितले. मेळाव्याला माजी जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, राजेंद्र देशमुख, विजसिंह परिहार, शालिकराम म्हस्के, आशा पांडे, आशा माळी, संजना जाधव, महेश आकात, मुकेश पांडे, शोभा मतकर, उषा आकात, संजय सरकटे, डॉ चंद्रकांत साबळे आदींची उपस्थिती होती.जिल्ह्यात मोसंबी या फळ पिकावर पतंजली या उद्योग समुहाच्यावतीने लवकरच प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा योगगुरु स्वामी रामदेव बाबा यांनी भोकरदन येथील शतकरी मेळाव्यात बोलतांना दिली. विशेष म्हणजे अंबडचे माजी आमदार अ‍ॅड. विलास खरात यांनी रामदेव यांची भेट घेऊन मोसंबी या फळपिकावर प्रक्रिया करणारा उद्योग जालना जिल्ह्यात सुरु करावा, अशी मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक पध्दतीने विचार करुन सायंकाळी शेतकरी मेळाव्यात प्रक्रिया उद्योगाची घोषणा केल्यामुळे अ‍ॅड. खरात यांनी स्वामी रामदेव बाबा यांचे आभार मानले.