शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो खचू नका, ज्ञानातूनच संकटावर मात करता येईल;पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्करांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 18:58 IST

पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांचा देहड या मुळगावी झाला सपत्नीक सत्कार

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना ) : शिक्षणासारखे दुसरे अमृत नाही, देशातील गरीबी दुर करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितले आहे की, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. माझ्या यशामागील गमक ही शिक्षणच आहे, अशा भावना पद्मश्री हिंमतराव बावस्कर यांनी आज व्यक्त केल्या. ते  देहेड या त्यांच्या मुळगावी झालेल्या सत्काराला प्रत्युत्तर देताना बोलत होते. 

भोकरदन तालुक्यातील देहेड या मुळगावी गावकऱ्यांच्यावतीने आज पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. सुरूवातीला लेझीमच्या तालावर बैलगाडीमधून डॉ. बावस्कर आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रमोदनी यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पुढे बोलताना डॉ. बावस्कर म्हणाले, जिवाचे रान करणाऱ्या शेतकरी माय-बापाच्या उपस्थितीत माझ्या जन्मभूमीत झालेला सत्कार  माझ्यासाठी जगातील सर्वोच्च मोठा पुरस्कार आहे. आईवडील आणि गावांनी माझ्यावर लहानपणी केलेल्या संस्काराच्या शिदोरीमुळेच मला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, अशी कृतज्ञता ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी नेहमी सकारात्मक राहावे, काही शेतकरी आपल्या परिवाराचा विचार न आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात, हे फार चुकीचे आहे. येणारा प्रत्येक काळ जाणारा असतो मग ते दुःख असो की सुख यासाठी शेतकऱ्यांनी खंबीरपणे संघर्ष केला पाहीजे, असे आवाहनही डॉ. बावस्कर यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, दलीत मिञ भगवान वाघ, माजी कृषी उपसंचालक भगवंतराव बावस्कर, जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड, लोकजागरचे केशव जंजाळ, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, नवनाथ पुंडलिक सोनवणे, डॉ. जनार्दन जाधव, ज्ञानेश्वर बावस्कर , कृष्णा वाघ, रामराव पाटील, राजु बावस्कर, अंबादास बावस्कर, सरपंच भारती बावस्कर, उपसरपंच शशिकला जाधव, गजानन जाधव, रावसाहेब बावस्कर आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Jalanaजालनाdoctorडॉक्टर