अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीसह इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. याा सर्वाधिक त्रास महिला, मुलींना सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
युवकांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण
जालना : मिटकॉन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १ मार्चपासून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यावसाय उभारणी, कर्ज यासह इतर बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिकाधिक युवक, युवतींनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन के.डी. दांडगे यांनी केले आहे.