शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत १४ देशांना मशीन्स निर्यात; जालन्याच्या आदिवासी भावंडांच्या उद्योगाला मानाचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 18:35 IST

जालना येथील एमआयडीसी तसेच दरेगाव येथे या चार आदिवासी बंधूंनी एकत्रित येत चार वर्षांपूर्वी पूजा रोटोमॅक मोल्डिंग टेक्नॉलजी या नावाने कंपनी स्थापन केली होती.

ठळक मुद्देजालन्याच्या आदिवासी भावंडांच्या शिरपेचात पुरस्काराचा तुराप्रतिष्ठेचा दिलीप दोशी पुरस्कार मिळवणारा मराठवाड्यातून एकमेव उद्योग

जालना : भोकरदन तालुक्यातील धोंडखेडा येथील मूळचे रहिवासी असलेल्या पाडळे बंधूंनी चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्लास्टिकच्या टाक्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी उत्पादनाची दखल एमआयडीसीने घेतली. त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला दिलीप दोशी स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

जालना येथील एमआयडीसी तसेच दरेगाव येथे या चार आदिवासी बंधूंनी एकत्रित येत चार वर्षांपूर्वी पूजा रोटोमॅक मोल्डिंग टेक्नॉलजी या नावाने कंपनी स्थापन केली होती. या चार वर्षांत कुशल कामगार तसेच उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी ही कंपनी नावारूपाला आणली. चार वर्षांत त्यांनी उत्पादनांची देशासह परदेशात निर्यात केली. त्यांच्या या कार्याची दखल एमआयडीसीने घेऊन त्यांना यंदाचा दिलीप दोशी स्मृती पुरस्कार जाहीर केला होता. त्याचे ऑनलाईन वितरण शनिवारी पार पडले.

या पुरस्काराचे स्वरूप रोख ५० हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह असे आहे. हा पुरस्कार मराठवाड्यातून जालन्यातील आदिवासी भावंडांनी उभ्या केलेल्या उद्योगास मिळाल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. शनिवारी पुरस्कार वितरणानंतर कंपनीत संचालकांसह कामगार आणि व्यवस्थापनाने पेढे वाटून त्याचे स्वागत केले. यावेळी कंपनीचे संचालक रत्नाकर पाडळे, नारायण पाडळे, भगवान पाडळे, संतोष पाडळे, भूषण खडके, वरिष्ठ अधिकारी प्रसन्ना देशपांडे आणि श्रीकांत देशपांडे यांची उपस्थिती होती.

कोरोना काळातही निर्यात केलीउद्योग, व्यवसाय उभारणीचा कुठलाही आधार नसताना या चार भावंडांनी अत्यंत कष्टातून हा उद्योग स्थापन केला. त्यात त्यांनी चार वर्षांत १४ देशांना आपल्या मशीन्स निर्यात केल्या आहेत. कोरोनातही या भावडांनी ही किमया साधली. सध्या कंपनीत पाडळे बंधूंनी जवळपास १८ कोटी रुपये गुंतवून ७६ जणांना रोजगार दिला आहे. चारही पाडळे बंधू यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम करून नंतर स्वत:ची कंपनी स्थापन केली.

टॅग्स :MIDCएमआयडीसीJalanaजालनाState Governmentराज्य सरकार