शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारात खरेदीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:48 IST

मराठी नववर्षाला अनेकांनी वाहन, सोने, गृह खरेदीचा मुहुर्त साधला. त्यानिमित्त रविवारी बाजारात सोने-चांदीच्या दुकानांसह, वाहनांच्या शोरूममध्ये दिवसभर गर्दी दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठी नववर्षाला अनेकांनी वाहन, सोने, गृह खरेदीचा मुहुर्त साधला. त्यानिमित्त रविवारी बाजारात सोने-चांदीच्या दुकानांसह, वाहनांच्या शोरूममध्ये दिवसभर गर्दी दिसून आली.साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुडी पाडव्याला नवीन वस्तू खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. शहरातील विविध वाहन खरेदीच्या शोरूमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांमार्फत विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. महिलांसाठी असलेल्या दुचाकींना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य शोरूमसह तालुका पातळीवर दिवसभरात सुमारे दीड हजारांवर वाहनांची खरेदी झाल्याचा अंदाज विक्रेते राहुल गुप्ता यांनी सांगितले. वाहन खरेदी बाजारात पाडव्यानिमित्त जवळपास चार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याच अंदाज येथील एका शोरूमचे व्यवस्थापक सचिन शाह यांनी व्यक्त केला. मागील वर्षीच्या तुलनेत वाहन बाजरातील उलाढाल वाढल्याचे त्यांनी सांगितले.महिलांचे खास आकर्षण असलेल्या सोने खरेदीला पाडव्यानिमित्त चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी असताना सराफा बाजारात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून आली. शुद्ध सोन्याला पाडव्याला ३१ हजार ५०० रुपये, असा दर मिळाला. सोने बाजारात खास महिलांसाठीच्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध दागिन्यांना अधिक मागणी राहिली, असे ज्वेलर्स व्यावसायिक गौतम मुनोत यांनी सांगितले. गुढी पाडव्यानिमित्त अनेकांनी आपल्या नूतन वास्तूंच्या कामाला प्रारंभ केला, तर काहींनी गृह प्रवेशाचा मृहुर्त साधला.एकंदरीतच गुढी पाडव्याला बाजारात खरेदीच्या उत्साहामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.गुढी पाडव्यानिमित्त अनेकांनी आपल्या नूतन वास्तूच्या कामाला प्रारंभ केला, तर काहींनी गृह प्रवेशाचा मुहूर्त साधला. यानिमित्त ठिकठिकाणी कार्यकमांचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले. नवीन घर बुकिंंगसाठी नोकरदार व्यक्तींनी मुद्दामहून पाडव्याचा मुहूर्त साधल्याचे येथील बांधकाम व्यावसायिक रितेश मंत्री यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.