शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जपानी मेंदूज्वराच्या कारणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:35 IST

आॅगस्ट महिन्यात कुंभार पिंपळगाव येथे ‘जपानी मेंदूज्वर’ या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा आजार आजार कसा उद्भवला, याबाबत तपासणी करण्यासाठी पुणे आरोग्य विभागाच्या सहसंचालक कार्यालयातील शास्त्रज्ञांचे पथक दोन दिवसांपासून कुंभार पिंपळगावात ठाण मांडून आहे.

कुंभार पिंपळगाव : आॅगस्ट महिन्यात कुंभार पिंपळगाव येथे ‘जपानी मेंदूज्वर’ या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा आजार आजार कसा उद्भवला, याबाबत तपासणी करण्यासाठी पुणे आरोग्य विभागाच्या सहसंचालक कार्यालयातील शास्त्रज्ञांचे पथक दोन दिवसांपासून कुंभार पिंपळगावात ठाण मांडून आहे. गुरुवारी पथकाने गावातून डासांचे संकलन केले.पथकात आरोग्य सहसंचालक कार्यालय पुणे येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. डी. गावंडे, डॉ. के.एस. शेळके, कीटक संहारक व्ही. एस. गवळी, डी. एन. काटे, आरोग्य अधिकारी डॉ. विलास रोडे, वैद्यकीय अधिकारी एस. बी. ढवळे, आरोग्य सहायक बी. ए. काळे, आरोग्य सेवक एकनाथ पोपळघट, डी. डी. कवठेकर, डी. ए. गर्जे यांचा समावेश आहे.गुरुवारी दोन पथकांनी गावातील काही भागांतून डासांचे संकलन केले, तसेच गावातील जनावरांच्या गोठ्याची तपासणी, जनावरांच्या रक्ताचे नमुने घेतले.या आजाराची उत्पत्ती कशी झाली याची कारणे शोधण्यासाठी गाव परिसरात पाच किलोमीटरपर्यंत तपासणी करण्यात आली.तपासणीत बहुतांश ठिकाणांहून डासांचे संकलन करण्यात आले. संकलन केलेले डास व रक्त नमुने पुणे येथील सहसंचालक प्रयोग शाळेत तपासण्यात येणार आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात मागील वीस वर्षात जपानी मेंदूज्वर हा आजार जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातील रायपूर येथे आढळून आला होता. कुंभार पिंपळगावात आढळलेल्या जपानी मेंदूज्वराच्या रुग्णानंतर प्रथमच कुंभार पिंपळगावात आॅगस्ट महिन्यात एक रुग्ण आढळून आल्याने राज्य आरोग्य विभागाने याची दखल घेत, ही तपासणी केल्याचे पथकातील तज्ज्ञांनी सांगितले.-------