सेवानिवृत्तीबद्दल जयंत वैद्य यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जयंत वैद्य, भीमराव बांगर, शिवाजी बजाज, दादासाहेब थेटे, दत्ता शिनगारे, चव्हाण आदी उपस्थित होते. डॉ. घुगे म्हणाले की, सैनिक कधी निवृत्त होत नसतात. माजी सैनिक सेना दलाचाच एक भाग आहे. त्यांची वेगळी प्रतिमा समाजात आहे. सैन्य दलात काम करीत असताना आत्मसात केलेली शिस्त ते सार्वजनिक आयुष्यात उपयोगी आणतात. अत्यंत बिकट परिस्थितीत देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सैनिक घेत असतात, असेही ते म्हणाले. यावेळी भाऊसाहेब पघळ म्हणाले की, १७ वर्षे सैन्यदलात सेवा केली. आता येणाऱ्या काळात युवकांना सैन्य भरतीचे धडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब थेटे यांनी केले. या कार्यक्रमाला रामेश्वर त्रिमुखे, जगदीश टकले, योगेश कव्हळे, राजभाऊ उगले, बी. टी. घुले, अशोक शिंदे, मोईन शेख, सुभाष काळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
माजी सैनिकांचे कर्तृत्व समाजासाठी प्रेरणादायी : घुगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST