शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताने हिरावले दोन्ही कुटुंबांचे सर्वस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:44 IST

भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त केली.

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त केली.सार्थकचे वडील राजू थेटे यांना गावाजवळच २० एकर कोरडवाहू शेती आहे. गावात त्यांचे स्वत:चे साधे घर आहे. शेतात कापूस, तूर ही पिके आहेत. त्यांना वैष्णवी (७वी), पार्थ (४ थी) , गायत्री (१ ली) अशी तीन अपत्ये आहेत. ही सर्व मुले जिल्हा परिषद शाळेत शिकणारी. तर ओंकारचे वडील कृष्णा चोरमारे हे सालगडी म्हणून काम इतराच्या शेतात काम करतात. त्यांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. काही महिन्यांपूर्वी ते कामाच्या शोधात पाथरवाला येथे आले होते. तेथेच त्यांना सालगडी म्हणून काम मिळाल्याने ते येथेच राहू लागले. त्यांना स्वत:चे घर नाही. उत्पन्नाचे कुठलेही दुसरे साधन नाही. म्हणून सालगडी म्हणून ते इतर शेतक-यांच्या शेतात काम करत होते.बुधवारचा दिवस या दोन्ही कुटुंबांसाठी घातवारच ठरला. नेहमीप्रमाणे ओंकार आणि सार्थक घराजवळच खेळत असताना उसाने भरलेला ट्रक उलटला आणि या दोन्ही मुलांच्या अंगावर संपूर्ण ऊस पडला. यातच दबून या दोन्ही चिमुकल्या जिवांचा करुण अंत झाला. गावक-यांना कळल्यानंतर ते तात्त्काळ मदतीसाठी गेले. दोन्ही मुलांचा जीव वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण तोपर्यंत या दोन्ही जिवांनी जगाचा निरोप घेतला होता. मुलांचा काहीही दोष नसताना जीव गमवावा लागल्याने दोन्ही मुलांच्या आईवडिलांनी आक्रोश केला. या घटनेनंतर दोन्ही मातांनी फोडलेल्या हंबरड्याने तर उपस्थितांचे हृदय हेलावले होते.