शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सर्वांनाच मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:19 IST

शहरात नगर परिषदेच्या वतीने सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून चंदनझिरा, नूतन वसाहत व पाणीवेस येथील केंद्रांवर अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात नगर परिषदेच्या वतीने सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून चंदनझिरा, नूतन वसाहत व पाणीवेस येथील केंद्रांवर अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहरातील झोपडपट्ट्या तसेच अन्य ठिकाणी कच्च्या घरात राहणा-या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी स्थळपाहणी करणार आहेत. आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, मतदान कार्ड, वीज बिल, बॅँक पासबुकची प्रत, कच्चे घर असल्यास कराची अद्ययावत पावती, जागेच्या मालकी खरेदीखत ही कागदपत्रे लाभासाठी आवश्यक आहेत.अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रे तपासणीकरिता उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि, आॅनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे असून त्याचा नमुना प्रकल्प व्यवस्थापकांकडे उपलब्ध करुन देण्यात आला आहे.सर्वेक्षण खर्चासाठी २५० रुपयांचे शुल्क नगर परिषदेकडून आकारले जाईल. चंदनझिरा येथील नगर परिषद शाळा, नूतन वसाहतमधील नगर परिषद शाळा आणि पाणीवेसमधील नगर परिषद दवाखाना या तीन ठिकाणी अर्ज वाटप व स्वीकृती सुरू राहणार आहे. नागरिकांनी उपरोक्त ठिकाणाहून अर्ज हस्तगत करुन आवश्यक कागदपत्रांसह त्याच ठिकाणी सादर करावेत व लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपाध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी केले आहे.