शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेक के बाद’ पुन्हा अतिक्रमण हटाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:14 IST

नगर पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली.

जालना : नगर पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली. शहरातील सहा ठिकाणांवरील अतिक्रमणे दिवसभराच्या कारवाईत हटविण्यात आली. दरम्यान, मामा चौक परिसरातील अतिक्रमण हटविताना काही वेळ तणाव निर्माण झाला होता.सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील रहदारीला अडथळा ठरणारी अनधिकृृत धार्मिक स्थळांची अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात पाच दिवस राबविलेल्या मोहिमेत शहरातील विविध भागांतील सुमारे साठ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. दरम्यान, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांचा वार्षिक तपासणी दौरा असल्यामुळे मागील आठवड्यात अतिक्रमण हटाव मोहिमेस बंदोबस्त मिळू शकला नव्हता. सोमवारी सकाळी दुस-या टप्प्यात नळगल्ली भागातून धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. मंगळबाजार भागातील गौस पाक नशान, गुरूगणेश भवन परिसरातील सै. सादत दर्गा, कादराबाद परिसरातील गौस पाक वीरका निशान या धार्मिक स्थळांची अतिक्रमणे दुपारी दीड वाजेपर्यंत हटविण्यात आली. गरीबशहा बाजार परिसरातील दोन समाध्या तसेच मामा चौकातील हजरत सय्यद सादत दर्गा कारवाईमध्ये हटविण्यात आला.मामा चौकात तणावमामा चौक परिसरातील अतिक्रमण काढत असताना, काही वेळ तणाव निर्माण झाला होता. नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. काही जणांनी या हे धार्मिक स्थळ अधिकृत असल्याची कागदपत्रे वकिलांच्यामार्फत सादर करण्याचा प्रयत्न केला. जमावातील एका युवकाने जेसीबी मशीनवर दगड मारल्यामुळे मशीनची काच फुटून नुकसान झाले. पोलिसांनी नागरिकांशी सकारात्मक चर्चा केल्यामुळे तणाव निवळला. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून शेख सलमान शेख शफीक (२१, रा.पेन्शनपुरा) या युवकावर स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.