शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग लागवडीसाठी रोजगार हमीतून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:17 IST

पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.ते शनिवारी कडवंची येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पंचक्रोशीतील शेक-यांची उपस्थिती होती.खोतकर यांनी शुक्रवार आणि शनिवारी असे दोन दिवस जालना मतदार संघातील विविध गावांना भेटी देऊन, कर्जमाफी, पीकविमा तसेच बोंडअळीचे अनुदान याचा आढावा घेतला. कडवंची येथे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथे द्राक्षाचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्या बाबत आपण विचार करत असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात जालना जिल्हयात तुतीची लागवड वाढली असून, त्याच्या खरेदीसाठी जालन्यातच रेशीकोष खरेदीबाजाराची स्थापना केली असून, त्याचा मोठा लाभ शेतकºयांना होत आहे. पूर्वी हे रेषीम कोष विक्रीसाठी शेतक-यांना कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते. तेथे जाण्या-येण्याचा खर्च वाचण्यासह वेळेचीही बचत यामुळे होत असल्याचे खोतकर म्हणाले.यावेळी त्यांनी वीज वितरण कंपनीतील अधिका-यांची बैठकही घेतली. वीजपुरवठा खंडित न करण्याच्या सूचना दिल्या.या ग्रामीण दौ-यात त्यांच्या समवेत जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, कडवंचीचे सरपंच चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रArjun Khotkarअर्जुन खोतकर