शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक गाठीभेटींवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:49 IST

जालना - औरंगाबाद स्थानिक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीने आता रंगत वाढवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना - औरंगाबाद स्थानिक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीने आता रंगत वाढवली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेचे निष्ठावान ज्येष्ठ नेते बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. तर युतीकडून औरंगाबाद येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवेंना रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पातळीवर प्रचारास प्रारंभ केला असून, वैय्यक्तीक भेटींवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.जालना - औरंगाबाद विधानपरिषदेत सध्या काँग्रेसचे विद्यमान आ. सुभाष झांबड हे आहेत. त्यमुळे काँग्रेसला यंदाही यश मिळेल काय या दिशेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा कस लागणार आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मागे घ्यावी लागल्याने कुलकर्णी नाराज होते. यंदा त्यांची नाराजी काँग्रेसने दूर केली आहे. कुलकर्णी यांना मोठा राजकीय वारसा असून, त्यांचे वडिल अंबडचे आमदार होते. तसेच अंबड पािलकेत काँग्रेसच्या माध्यमातून बहुतांश काळ हा कुलकर्णी परिवाराचा वरचष्मा होता. आजही बाबूराव कुलकर्णी यांचा मुलगा अंबड पालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.दरम्यान अंबादास दानवे हे कुलकर्णी यांच्यापेक्षा वयाने तरूण आहेत. तसेच या निवडणूकीत मतदारांचा विचार करता, युतीचे पारडे जड आहे. दानवे हे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी भाजपयुमोच्या माध्यमातून जालन्यातही तेवढाच संपर्क ठेवला होता. त्यातच युतीकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दिग्गज प्रचारात असल्याने काँग्रेस आणि युतीत चुरस निर्माण झाली आहे. कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यात येऊन काँग्रेस नेत्यांच्या तसेच नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. तसेच दानवे यांनीही एकदा जालन्याचा दौरा केला होता.त्यावेळी त्यांच्या समवेत माजी . खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शहराध्यक्ष विष्णू पाचफुले आदींची उपस्थिी होती.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPoliticsराजकारण