शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

दोन हजार जणांना निवडणुकीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:46 IST

शनिवार व रविवार या दोनदिवसीय प्रशिक्षणात जालना तालुक्यातील १९९७ निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी विधानसभेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. शनिवार व रविवार या दोनदिवसीय प्रशिक्षणात जालना तालुक्यातील १९९७ निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.या दोन दिवसीय प्रशिक्षणात तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात मतदान प्रक्रियेतील बारीक- सारीक गोष्टी समजून सांगण्यात आल्या. यामुळे प्रशिक्षणार्थिंचे मनोबल वाढल्याचे दिसून आले.२१ आॅक्टोबरला जालना विधानसभेसाठी मतदान होत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचा-यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात नाममात्र गैरहजर राहिलेल्या कर्मचा-यांना नोटिसा देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी मतदानाच्या कामाची माहिती दिली. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानापूर्वी कोणती तयारी करायची, प्रत्यक्ष मतदान आणि मतदान झाल्यानंतर कोमती कामे करावीत, याची माहिती देवून कंट्रोल युनिट, बायलेट युनिट, व्ही- व्हीव्हीपॅट या यंत्रांची काळजीपूर्वक हाताळणी जोडणी व बंद करताना घ्यावयाची काळजी इ. बाबींचे महत्व उपस्थिती निवडणूक कर्मचा-यांना समजून सांगितले. तसेच कर्मचाºयांना दिलेल्या जबाबदारीत कोणताही कसूर करू नये, असेही त्यांनी सांगितले. दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाने विशेष आयकॉन यंत्रणेची व्यवस्था केली आहे. त्यांच्या गरजा ओळखून कशी मदत करावी, याविषयी निकेश मदारे यांनी माहिती दिली.याप्रसंगी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, गणेश पोलास, देवीदास गाडेकर, तालुका कृषी अधिकारी ए. टी. सुखदेवे, दिनकर पालवे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, मंडळ अधिकारी व शासकीय- निमशासकीय कर्मचा-यांची उपस्थिती होती.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगGovernmentसरकार