शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:31 IST

जालना तालुक्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांचे लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रशिक्षण शुकवारी शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/रामनगर : जालना तालुक्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांचे लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रशिक्षण शुकवारी शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे पार पडले.या प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. प्रशिक्षणार्थींना मतदान यंत्राची हाताळणी कशी करावी, हे सांगितले .आगामी लोकसभा निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडली जावी यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. २३ एप्रिलला जालना लोकसभा मतदार संघाचे मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा पहिल्यांदा समावेश केला आहे. यामुळे याची माहिती सुध्दा कर्मचाऱ्यांना देण्यात आली. आणि मतदाराच्या वेळी सर्वानी सतर्क राहून आपले कार्य चोख बजावण्याची आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी कर्मचाºयांना दिले. दोन दिवस तीन टप्प्यांत उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके तसेच तहसीलदार महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणूक साहित्य ताब्यात घेणे. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानापूर्वी करावयाची तयारी यानंतर प्रत्यक्ष मतदान आणि मतदान संपल्यावर करावयाची कामे तसेच कंट्रोल युनिट, बायलेट युनिट, व्ही व्हीव्हीपॅट या यंत्रांची काळजीपूर्वक हाताळणी जोडणी तसेच बंद करतेवेळी घ्यावयाची काळजी या सर्व बाबी पीपीटीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना समजावून सांगितल्या.दरम्यान २६१ जण गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सुधाळकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRevenue Departmentमहसूल विभागGovernmentसरकार