शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

मुख्यमंत्री फ्लॅगशिप कार्यक्रमात आठ गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:50 IST

मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आठ गावांची निवड करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन प्राधान्याने करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आठ गावांची निवड करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन प्राधान्याने करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले.मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या आठ गावांच्या कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी घेण्यात आली. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत सीएसआर फंडाच्या माध्यमातून एक हजार गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातील आठ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव, माळेगाव, मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव, अंभोरा जहांगीर, देवगाव खवणे, नायगाव प्र. सेवली व परतूर तालुक्यातील हातडी या गावांचा समावेश आहे. या गावांच्या सर्वांगिण विकासासाठी गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन गावात प्राधान्याने करावयाच्या विकास कामांबाबत गावक-यांची चर्चा करण्यात यावी. तसेच तालुकास्तरीय अधिकाºयांच्या बैठकीचे तातडीने आयोजन करुन या कामांचा आराखडा तयार करण्यात यावा. गावांमध्ये उभारण्यात आलेल्या शौचालयांचा प्रभावी वापर होण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. गावात कृषि विकासासाठी शेडनेट, शेततळे, ड्रीप, स्प्रिंकलर आदी वापरावर भर देण्याबरोबरच पाणीपुरवठा, डिजिटल शाळा, आरोग्य सुविधांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, ग्रामीण विकास यंत्रणेचे सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी आदींची उपस्थिती होती.