शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बारा बलुतेदार विकास महामंडळासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

जालना : राज्यातील बारा बलुतेदारांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह ते तातडीने कार्यान्वित ...

जालना : राज्यातील बारा बलुतेदारांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह ते तातडीने कार्यान्वित होण्यासाठी शासनाच्या स्तरावर पुढाकार घेणार असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, उपाध्यक्ष राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, अ‍ॅड. संजय काळबांडे, डॉ. विशाल धानुरे आदींच्या शिष्टमंडळाने टोपे यांची गुरुवारी मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील बारा बलुतेदारांचे प्रश्‍न व समस्या मांडल्या. महासंघाचे अध्यक्ष दळे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ प्रस्तावित केले असले तरी अद्याप हे महामंडळ स्थापन करण्यात आलेले नाही. दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्याचे बारा बलुतेदारांचे व्यवसाय पूर्णपणे बंद होते. व्यवसाय बंद असल्यामुळे बारा बलुतेदार हा पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला असून, निकषात बसत नसल्यामुळे कोणत्याही बँका कर्ज देण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे राज्यातील बारा बलुतेदारांना शासनाकडून आर्थिक मदत होणे गरजेचे असून, बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याची मागणीही दळे यांनी केली. या वेळी टोपे यांनीही या मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.