शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा सरकाचा प्रयत्न: अजित पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 21:33 IST

विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

जालना : विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, की सहकार क्षेत्रात चांगले काम करणाºया संस्थांनी दीर्घकाळ परिश्रम घेऊन सहकार चळवळीला बळ देण्याचे काम केले आहे. मात्र, लहान-मोठ्या सहकारी व नागरी बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करून सहकार चळवळ संपविण्याचा सरकारचा डाव आहे. जीएसटीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा ताण पडला असून, कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. महागाई प्रचंड वाढली असून, पेट्रोल, गॅस दरवाढीतून सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. असे असताना सरकार बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहत आहे. बुलेट ट्रेनऐवजी सरकारने आहे, ते रेल्वेरुळ ठीक करून अपघात घडणार नाही याची काळजी घ्यावी. सत्तेत असणाºया शिवसेनेने सरकारला जनहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्याऐवजी तेच रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. त्यामुळे शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली.  पुरोगामी विचारांच्या लोक, पत्रकार यांचे खून होत असताना तपास लागत नाही, यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  मुंबई विद्यापीठ निकाल म्हणजे तारीख पे तारीखराज्याच्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीवर अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. शिक्षण विभाग रोज नवे फतवे काढत आहे. एकीकडे क्रीडा शिक्षकांची भरती बंद असताना दुसरीकडे एकाच दिवसात दहा लाख मुलांचे फुटबॉल सामने घेतले जात आहेत. मुंबई विद्यापीठाचा निकाल म्हणजे तारीख पे तारीख, सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पवार म्हणाले.