शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाला बिबट्याची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:35 IST

गेल्या दोन महिन्यांपाासून बिबट्याच्या भीतीने परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान गुरूवारी हा बिबट्या राणीउंचेगाव तसेच अंबड तालुक्यातील शहापूर येथे दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर लगेचच वनविभागाने खबरदारी घेत शार्प शुटरसह वैद्यकीय पथक औरंगाबाद येथून पाठविले होते. ही शोध मोहीम रात्री आठ वाजे पर्यंत चालली मात्र, बिबट्याने पुन्हा एकदा वनविभागाला हुलकावणी दिली आहे.

ठळक मुद्देशहापूर परिसर : शार्पशूटरसह वैद्यकीय पथक हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/रणीउंचेगाव : गेल्या दोन महिन्यांपाासून बिबट्याच्या भीतीने परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान गुरूवारी हा बिबट्या राणीउंचेगाव तसेच अंबड तालुक्यातील शहापूर येथे दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर लगेचच वनविभागाने खबरदारी घेत शार्प शुटरसह वैद्यकीय पथक औरंगाबाद येथून पाठविले होते. ही शोध मोहीम रात्री आठ वाजे पर्यंत चालली मात्र, बिबट्याने पुन्हा एकदा वनविभागाला हुलकावणी दिली आहे.राणीउंचेगाव, तळेगाव परिसरतही हा बिबट्या फिरत असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून वडीगोद्री, शहापूर, शहागड तसेच राणीउंचेगाव, तळेगाव या भागात या बिबट्याची दहशत आहे. या बिबट्याने आता पर्यंत अनेक मुक्या प्राण्यांचा फडशा पाडला आहे. तर एका शेतमजूराचा बळीही घेतला आहे.या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी, त्यात त्यांना यश मिळत नसलस्याचे दिसून येत आहे. यासाठी तीन पथके आणि ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालाचाली टिपण्यात आल्याने वनविभागाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. चार दिवसांपूर्वी तो वनविभागच्या शार्पशुटरसह वैद्यकीय पथकाच्या नजेरेसही पडला. मात्र, त्याला बेशुध्द करणारे इंजेक्शन त्याच्यापर्यंत गणमधून पोहचे पर्यंत तो गर्द ऊसाच्या शेतीत पळून गेल्याने उत्साह मावळला.दरम्यान गुरूवारी येथील सहायक वनसरंक्षणक जी.एम. शिंदे यांना शहापुर परिसरातील नागरिकांनी माहिती दिल्यानुसार त्यांनी लगेचच औरंगाबाद येथे संपर्क करून वैद्यकीय पथकासह शार्प शुटरला शहापूर परिसरात पाचारण केले होते. जवळपास शंभर ते १५० ग्रामस्थांनी देखील बिबट्याला पकडण्यासाठी चंग बांधला होता. मात्र गुरूवारी दिवसभर त्याचा शोध घेऊनही तो नजरेस न पडल्याने या मोहीमेचा हिरमोड झाला.

टॅग्स :Jalanaजालनाforest departmentवनविभागleopardबिबट्या