शहरं
Join us  
Trending Stories
1
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
2
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
3
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
4
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
5
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
6
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
7
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
8
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
9
वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
10
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
11
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
12
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
13
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
14
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
15
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
16
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
17
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
18
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
19
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
20
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा

मोकाट कुत्रे दररोज दहा जणांचे तोडतात लचके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:07 IST

उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या जालना शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या जालना शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. दररोज एक, दोन नव्हे तब्बल दहा ते बारा जणांचे लचके हे मोकाट कुत्रे तोडत आहेत. मोकाट कुत्र्यांमुळे शहरवासिय हैराण झालेले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची चर्चा केवळ पालिकेच्या सभागृहात होते. नंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकही चिडीचूप राहत असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना शहरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल सोयरसुतक नसल्याचे दुर्दैवी चित्र मागील अनेक वर्षांपासून दिसत आहे.जालना शहरातील मुख्य मार्ग असो, बाजारपेठ असो किंवा गल्ली- बोळातील रस्ते असोत; मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरे दिसले नाही तर नवलच! दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मागे धावणारे कुत्रे असोत किंवा बाजारपेठ, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात फिरणारी मोकाट जनावरे असोत; यामुळे शहरवासीय चांगलेच हैराण झाले आहेत. जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे, हा मुद्दा केवळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सतत चर्चिला जातो. विरोधक पोटतिडकीने मुद्दा मांडतात. सत्ताधारी निर्बिजिकरणाचे आश्वासन देतात आणि अधिकारी कार्यवाही करण्याचे वचन देतात. मात्र, ही प्रक्रिया केवळ सभागृहातील चर्चेपुरतीच मर्यादित राहत असल्याचे वास्तव आहे.जालना येथील जिल्हा रूग्णालयात मागील २१ दिवसांत कुत्र्याने चावा घेतलेले एक दोन नव्हे तर तब्बल २२५ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यात २० ते २६ जानेवारी या कालावधीत ७१ जणांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले आहेत. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ७९ जणांनी तर ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत मोकाट कुत्रे चावलेल्या ७५ जणांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले आहेत. केवळ सरकारी रुग्णालयातील ही आकडेवारी असून, खाजगी रूग्णालयात उपचार घेणाºयांची संख्या वेगळीच आहे. यातील बहुतांश रूग्ण हे शहरातील असून, ग्रामीण भागातून येणा-या रूग्णांची संख्या कमीच आहे.विशेषत: मागील अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. मात्र, मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेले नगर पालिका प्रशासन, विरोधक मात्र, याकडे नेहमीच कानाडोळा करीत आले आहेत.मोकाट जनावरांविरूध्दची कारवाई मोहीमही गुंडाळलीशहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्ग, अंतर्गत भागात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. शाळा, महाविद्यालयाच्या आवारातही ही मोकाट जनावरे फिरत असून, याचा शाळकरी मुलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा भर रस्त्यात जनावरे बसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या जनावरांविरूध्द वाहतूक शाखा व पालिकेने सुरू केलेली संयुक्त कारवाईची मोहीमही गुंडाळण्यात आली आहे.

टॅग्स :dogकुत्राJalana Muncipalityजालना नगरपरिषद