शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्याचे तोडले लचके; आई अन् आजी धावून आल्याने वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 15:35 IST

या कुत्र्यांच्या चाव्याने धायमोकलून रडणाऱ्या मुलाचा आवाज ऐकून घरातून मुलाची आई आणि आजी या धावत घराबाहेर आल्या.

जालना : शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. रात्री रस्त्यावरून जीव मुठीत धरूनच जावे लागते. याच श्वानांच्या दहशतीच्या तावडीत जुना जालना भागातील समर्थनगरमधील रहिवासी साईराज राहुल डफडे (३) हा सापडला. मात्र, आई अन् आजीने जिवाची पर्वा न करता कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या साईराजला सोडवले व त्याला रुग्णालयात नेल्याने त्याचे प्राण वाचले.

बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास साईराज हा समर्थनगरधील त्यांच्या घरासमोरील अंगणात खेळत होता. याचदरम्यान चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या गालाचे, तसेच पायाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. या कुत्र्यांच्या चाव्याने धायमोकलून रडणाऱ्या मुलाचा आवाज ऐकून घरातून मुलाची आई आणि आजी या धावत घराबाहेर आल्या. त्यांनी जिवाची पर्वा न करता त्या कुत्र्यांच्या तावडीतून साईराजला सोडवून थेट जिल्हा रुग्णालय गाठले. तोपर्यंत साईराजला तीन ते चार ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुत्र्यांची संख्या वाढल्याने दहशतजालना शहरात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच मांसाहरी दुकानांच्या समोर कुत्र्यांचा घोळकाच असतो. त्यामुळे ही दुकाने हटवावीत अशी मागणी वेळोवेळी या भागाचे नगरसेवक शशिकांत घुगे यांनी केली होती. याबद्दलचा मुद्दा त्यांनी पालिकेच्या सभेतही मांडला होता. परंतु, त्याकडे दर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आज दैव बलवत्तर म्हणून तीन वर्षाच्या साईराज डफडेचे प्राण वाचल्याचे नगरसेवक घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :dogकुत्राJalanaजालना