शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:29 IST

लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कयंंदा कधी नव्हे तो जून मध्येच चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या पेरणीसाठीच्या तयारीत गुंतला आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे.भाजप आणि शिवसेना युती बाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर कुठलाच निर्णय झालेला नाही. आणि उमेदवार कोण असतील हा प्रश्न तर अद्याप पक्षाच्या पटलावरही नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांतील दानवे आणि खोतकर यांच्यातील शाब्दिक युध्द टोकाला पोहोचले आहे. यामुळे ज्या प्रमाणे मुंबई महानगर पालिका तसेच पालघर निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून निवडणुका लढवल्या. त्यामुळे तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विषयही जनतेसमोर आला नाही. त्याच धर्तीवर जालना लोकसभा मतदार संघात दानवे व खोतकरांकडून रणनीती आखली जात आहे की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. २००९ मध्ये अर्जुन खोतकरांना शिवसेनेने घनसावंगी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती, त्यावेळी देखील खोतकरांनी तेथे आक्रमक प्रचार करून राजेश टोपे यांना मोठी टक्कर दिली होती. त्यानुसारच आता खोतकर हे आक्रमकपणे दानवेंवर तुटून पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून कोणाचा किती फायदा होणार हे येणारा काळच ठरवेल.युतीचा निर्णय न होताच दानवे आणि खोतकरांमध्येच निवडणूक होणार हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचे काम आतापासून माध्यमांच्या माध्यमातून होत आहे. या दोघांनी जे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत, त्यात त्यांनी यापूर्वी कधीही कुठल्या जबाबदार शासकीय यंत्रणेकडे एकमेकांच्या विरोधात कधी पुरावे दिल्याचे समोर येत नाही. त्यामुळे मूळ यंत्रणेला बाजूला ठेवून, केवळ माध्यमातून आम्ही दोघे किती एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो आहेत, हे चित्र पध्दतशीरपणे रंगवले जात आहे. त्यामुळे जनतेतून काँग्रेसकडून कोण उभे राहणार, कोणाला उमेदवारी मिळणार या बाबत विचार करण्यास वेळच दिला जाऊ नये हा ही हेतू या आरोप-प्रत्यारोपातून साध्य केला जात असल्याचे वास्तव आहे.एकूणच जालना बाजार समितीची निवडणूक आणि त्यानंतर झालेली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून दानवे व खोतकर यांच्यातील वादाला जास्त धार आली. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या जागावाटपावरूनही बराच खल या दोन नेत्यांमध्ये झाला होता. त्यात तडजोड होऊन युती करून ही निवडणूक लढवली आणि सभापती ऐवजी उपसभापती पदावर रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू भास्कर दानवे यांना देऊन येथे समेट झाली. नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळावणी करून अध्यक्षपदी अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांना संधी मिळाल्याने तर भाजपचा तीळपापड झाला होता.या मुद्यांसह रस्ते विकासाचा शुभारंभ असो की नगराध्यक्षाची निवडणूक; यातून दानवे आणि खोतकरांमधील मतभेद वाढतच गेले. आणि आता तर, त्या दोघांनी एकमेकांच्या ‘अर्थपूर्ण’ उन्नतीचे स्त्रोत सांगून मोठा राजकीय धुरळा उडवून दिला आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर