शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

बाराशे बॅलेट मशीनचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:54 IST

जालना लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. लोकसभा मतदारसंघात एकूण २० उमेदवार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिटची गरज पडणार आहे. ही बाब लक्षात घेता, एक हजार २०० बॅलेट युनिट या बुलडाणा येथून मागवल्या असून, त्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना लोकसभा मतदार संघात यंदा १६ पेक्षा कमी उमेदवार राहीतील असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने जालना लोकसभा मतदार संघात अतिरिक्त एक बॅलेट युनिट आणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या अतिरिक्त बॅलेट युनिट बुलडाणा येथून आणण्यात आल्या असून, पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड विधानसभेसाठी ८०० बॅलेट युनिट पाठवण्यात आल्या असून, जालना, भोकरदन आणि बदनापूरसाठी ४०० बॅलेट युनिट दाखल झाल्या आहेत.आचारसंहिता भंगाचे गुन्हेजालना लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा दिवसांमध्ये आठ आचार संहिता भंगाचे गुन्हे दासखल करण्यात आले आहेत. त्यात विशेष करून बॅनर लावण्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. एकूणच घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे एका गाडीत ८५ लाख रूपये रोख सापडले होते. त्याचा खुलासा प्राप्तीकर विभागाकडून मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले.दोन दिवसांचे प्रशिक्षणजालना विधानसभे अंतर्गत निवडणूक विभागात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सेंट मेरी हायस्कूलमध्ये पार पडले. पहिल्या दिवशी ५ कर्मचारी गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांची उत्तरे संयुक्तिक वाटल्यास त्यांना मुभा दिली जाईल, नसता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.जालना लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता काळात ११ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एकूण ८३ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. यात ४८ वारस व ३५ बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ४९ आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आले आहे. तसेच हातभट्टी ६४७ लिटर रसायन ९८९६ लिटर देशी ३३१.८६ ब. लिटर विदेशी २३.८ लिटर आणि ११ वाहने जप्त करण्यात आले आहेत. तसेच १० लाख ६९ हजार ६१९ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाJalna Policeजालना पोलीस