शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्ज प्रस्तावाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:54 IST

तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा जिल्ह्यातील ७५ दिव्यांगांना राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातर्फे (मुंबई) अल्प व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदा जिल्ह्यातील ७५ दिव्यांगांना राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातर्फे (मुंबई) अल्प व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी जिल्हा कार्यालय दिव्यांग महामंडळाकडून, फॉर्मचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती वसुली अधिकारी कृष्णा जाधव यांनी दिली आहे.या संदर्भात लोकमतने ७ जानेवारीला दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिव्यांगांना मिळणार कर्ज या मथळ््याखाली वृत्त छापले होते. याची दखल घेत समाज कार्यालयाकडून फॉमचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे अनेक दिव्यांगांनी लोकमतचे आभार मानले आहे.दिव्यांगांची बेरोजगारीतून मुक्तता व्हावी, त्यांना स्वत:च्या पायावर उभा राहता यावे, यासाठी सन २००३ पासून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळा कडून अल्प व्याजदरात कर्ज वितरीत केल्या जात आहे. सन २००३ पासून २०१६ पर्यंत १ हजार १०० दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना जवळपास पावने सहा कोटी रूपयांचे वाटप शासनातर्फे करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यंदा सन २०१८- १९ साठी शासनाने जिल्हा कार्यालयाला ७५ जणांना कर्ज वितरित करण्याचे उद्दीष्टे दिले होते. त्यामुळे सोमवारी कार्यालयातर्फे कर्जाचे फॉर्म वितरित करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांग व्यक्तींनी कर्जाचे फॉम घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, शासनाने कार्यालयाला ७५ फॉम दिले होते. यामुळे प्रथम आलेल्या नागरिकांनाच फॉर्म देताना प्राधान्य देण्यात आले आहे.फॉर्म दिलेल्यांकडून सात ते आठ दिवसात कागदपत्रांसह फॉर्म भरून घेतले जाणार असून कागदपत्रांची तपासणी करून अर्जाचे प्रस्ताव जालना जिल्हा कार्यालयाकडून मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.लाभार्थी : कागदपत्रे लागणारकर्ज देण्यासाठी या दिव्यांग व्यक्तीकडे ४० टक्यापेक्षा अधिकचे दिव्यांग प्रमाणपत्र हवे आहे. लाभार्थी १८ ते ६० वयोगटातील असून वयाचा दाखला, मतदान कार्ड, आधार कार्ड, प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रे लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाLokmatलोकमतSocialसामाजिक