मंगुळजळगाव येथे निधी संकलन यात्रा
घनसावंगी : तालुक्यातील मंगुळजळगाव येथे अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर निधी संकलनासाठी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी गावातील अनेकांनी निधी देऊन मदत केली. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.
लक्ष्मीनारायण पुरा येथे रक्तदान शिबिर
जालना : प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील लक्ष्मीनारायण पुरा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ५१ दात्यांनी रक्तदान केले. जयमातादी ग्रुप व आर्यन दादा म्याका मित्रमंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास अनंत म्याका, बाबू मारावार, राजू फेदराम, गोपाल चित्राल, छोटू चित्राल, राहुल गुंटूक, महेंद्र मंचेवार, रमेश बुरला, आशिष ठाकूर, सनी चिलका, आदेश पंजाल आदींची उपस्थिती होती.
वालसावंगीत दिनेश कुलकर्णी यांचा सत्कार
वालसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश कुलकर्णी यांची बदली झाली आहे. यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ.अमोल पवार, हरेंद्र बागडे, खिल्लारे, लाड, आशिष भुते, प्रकाश फुसे, शहा यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.